नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार तर्फे तसेच राज्य सरकार तर्फे विविध योजना राबवल्या जातात आणि या सर्वच्या सर्व योजना महाडीबीटी फार्मर्स स्कीम मार्फत राबवल्या जातात. मित्रांनो 2022 मध्ये एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता याचं शासन निर्णयाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकार व राज्य सरकार तर्फे ज्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात या योजनांचा लाभ खरीप हंगाम पूर्वी शेतकऱ्यांना दिला जावा.



MAHADBT Farmer Registration

कारण आपल्या राज्यामध्ये खरीप हंगाम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते त्यामुळे या योजनांचा लाभ जर द्यायचा असेल तर खरीप हंगामापूर्वी या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जावा आणि त्या अनुषंगानेच आता 2023 मध्ये देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून पुढे अंमलबजावणी केली जात आहे आणि 2023 मध्ये आता मागील त्याला योजना हा एक उपक्रम हाती घेण्यात आलेला.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामिल व्हा 

आहे तरी या उपक्रमांतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना केंद्र सरकार राज्य सरकार तर्फे महाडीबीटी फार्मर स्कीमार्फत राबवल्या जातात या योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत मागील त्याला योजना या मोहिमेच्या माध्यमातून आपण कोण कोणत्या योजनांसाठी अर्ज करू शकता कोणकोणत्या योजनांचा लाभ आपण घेऊ शकतात.


• कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये आपण बीबीए पेरणी यंत्रासाठी देखील अर्ज करू शकता.


• सिंचन साधनेमध्ये आपण ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल त्याचबरोबर पीव्हीसी पाईप असेल अशा प्रकारे या योजनांसाठी देखील आपण अर्ज करू शकतात.


• त्याचबरोबर मागेल त्याला फळबाग या योजनेअंतर्गत देखील आपण फळबाग लागवडीसाठी अर्ज करू शकता.


• त्याचबरोबर हरितगृह असेल कॉटन सेंटर असेल सिंचन सुविधा साधनेच्या योजनेमध्ये मागेल त्याला शेततळे असेल शेततळ्याचा अस्तरीकरण असेल.

MAHADBT Farmer New Registration 

या सर्व योजनांसाठी आपण महाडीबीटी फार्मर पोर्टल द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी आपल्याला फक्त 23 रुपये 60 पैशाचा पेमेंट त्या ठिकाणी करावा लागतं तर या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावा अशा प्रकारे कृषी विभागामार्फत आव्हान करण्यात आलेला आहे.

 या महिन्यांमध्ये आपण जर अर्ज केला तर जास्तीत जास्त शेतकरी यासाठी पात्र केले जाणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी लवकर अर्ज केलेला आहे अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर खरीप हंगामापूर्वी फायदा व्हावा यासाठी 30 मे पर्यंत याची सोडत काढली जाणार आहे म्हणजे लॉटरीची सोडत यासाठी काढली जाणार आहे आणि मित्रहो लॉटरी लागल्यानंतर लॉटरीमध्ये ज्या शेतकऱ्यांच नाव आलेला आहे अशा शेतकऱ्यांना 10 जून पूर्वी पूर्वसंमती देऊन यासंदर्भातील पुढील प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडली जाणार आहे.

MAHADBT Farmer

 त्यामुळे आपल्याला खरीप हंगामापूर्वी या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे या विविध योजनांचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर लवकरात लवकर यासाठी अर्ज करा कारण या महिन्यामध्ये आपण जर अर्ज केला तर लवकरात लवकर आपण पात्र होऊ शकता आणि आपल्याला या योजनांचा खरीप हंगामापूर्वी लाभ घेता येऊ शकतो.

MAHADBT Farmer New Registration And Apply Schemes Online