Aadhar Card Bank Linking Status

 नमस्कार मित्रांनो जस की आपल्याला माहीतच आहे बँकिंगचे कोणतेही व्यवहार आपल्याला ऑनलाईन करायचे असतील. तर आपला आधार कार्ड बँकेच्या अकाउंट शी लिंक करणे सर्वात महत्त्वाचं असतं.


 जर आपले आधार कार्ड बँकेच्या अकाउंट शी लिंक नसेल तर आपण आपले जे काही बँकेचे व्यवहार असतात ते ऑनलाईन करू शकत नाही. तर मग आपल्या आधार कार्ड आपल्या बँकेच्या अकाउंट ची लिंक आहे की नाही हे कसं बघायचं हे आपण आज या लेखा मध्ये पाहणार आहोत ते पण आपल्या मोबाईल वर.

    

शेतकऱ्यांना पेरणीसाठी १०,००० रूपये मिळणार


मित्रांनो सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर हा आपल्या आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे तरच आपण है चेक करू शकता. जर तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्ड शी लिंक नसेल तर तुम्हाला है चेक करता येणार नाही.


•सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल मध्ये आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळावरील Resident Portel यायचं आहे. त्याची लिंक इथे दिलें आहे 👇🏻

इथे क्लिक करा


Aadhar Card Bank Linking Status 

• Resident Portel तुमच्या मोबाईल मध्ये ओपन झाला नंतर खालील check aadhar/bank seeding status या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.


• check aadhar/bank seeding status या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. व खालील दिलेला Captcha Code टाकाचा आहे. खालील सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करायचं.


• आता तिथे जो मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक असेल त्यावर आलेला OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकला नंतर खालील SUBMIT या बटनावर क्लिक करावे.


• SUBMIT केल्यानंतर आता तुमच्या आधार कार्ड वरील बँक लिंकिंग स्टेटस दिसतील.

Aadhar Card Bank Linking Status


• तिथे तुम्ही कोणता तारखेला आधार बँकेला लिंक केलेले खाली त्या बँक चे नाव ही सर्व माहिती तिथे तुम्हाला दिसेल.