RBI to withdraw Rs 2000 notes

नमस्कार मित्रांनो आरबीआय अर्थात रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिनांक 19 मे 2023 रोजी अचानक दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा परत घेण्याचा निर्णय जाहीर करून सर्वांना धक्का दिलेला आहे सन 2016 सालच्या नोटबंदी नंतर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या तब्बल सात वर्षानंतर आता या नोटा चलनातून बंद करण्यात येत आहे. मित्रांनो नोटा चलनात कधीपर्यंत चालणार. नोटा बदलून कशा मिळणार. अशा विविध प्रश्नांंबाबत सविस्तर माहिती पाहूया.


मित्रांनो दिनांक 19 मे 2023 रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया ने दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. इतर मूल्याच्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात असल्याचे कारण सांगून दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करत असल्याचे कारण आरबीआय कडून सांगण्यात आलेले आहे. 30 सप्टेंबर 2023 पासून दोन हजार रुपयांच्या नोटा जरी बंद होत असल्या तरीही 30 सप्टेंबर 2023 नंतरही दोन हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर म्हणजेच वद्य राहणार आहे. मित्रांनो आता या ठिकाणी तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न निर्माण झालेले असतील अशा प्रश्नांबाबत या ठिकाणी एक एक करून उत्तरे पाहूया.

• दोन हजार रुपयांच्या नोटा कधीपर्यंत बँकेमध्ये जमा कराव्या लागणार आहे?
आरबीआय केलेल्या पत्रकारानुसार 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेमध्ये जाऊन जमा करता येणार आहे.

• बँकेत खाते नसेल तर अशा व्यक्तीने दोन हजार रुपयांच्या नोटा कुठे जमा करायच्या आहे?
दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करताना कोणत्याही बँकेत खातं असावं अशी कोणतीही अट नाही तुमचे बँकेत खाते जरी नसले तरी कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही तुमच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकता.

RBI to withdraw Rs 2000 notes

• दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याकरिता काही मर्यादा आहे का?
दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करताना एका वेळी फक्त वीस हजार रुपयांच्या नोटा म्हणजेच एकूण दहा दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेता येणार आहे.मात्र बँक खात्यात कितीही नोटा जमा करता येणार आहे. फक्त बदलून एकावेळी वीस हजार रुपये हे मिळणार आहे.

• नोटा बदलून घेण्याकरिता बँकेकडून काही फी आकारण्यात येईल का?
दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याकरिता अथवा बदलून घेण्याकरिता बँकेकडून कोणतेही फी आकारण्यात येणार नाही.

• जर कुणाला 20 हजार रुपयांपेक्षा जास्त कॅश बँकेतून हवी असल्यास काय करावे लागेल?  तुम्ही दोन हजार रुपयांच्या कितीही नोटा बँकेत जमा करू शकणार आहात. मात्र रोख स्वरूपामध्ये एका वेळी फक्त तुम्हाला वीस हजार रुपये बँकेमधून काढता येणार आहे.जास्त रकमेची गरज तुम्हाला असल्यास ऑनलाईन किंवा चेक द्वारे तुम्हाला व्यवहार करावे लागणार आहे. केश पैसे तुम्हाला 20 हजार रुपयांच्या पेक्षा जास्त बँकेकडून मिळणार नाही.

RBI to withdraw Rs 2000 notes

दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबर नंतरही वद्य म्हणजेच कायदेशीर असणार आहेत का? 30 सप्टेंबर 2023 नंतरही दोन हजार रुपयांच्या नोटा या वद्य म्हणजेच कायदेशीर असणार आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार चार महिन्याचा कालावधी नोटा बदलून घेण्याकरिता पुरेसा आहे दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दिलीला मुदती मुळे बँकांमध्ये परत येतील असे आरबीआयचे या ठिकाणी म्हणणे आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे आता 2000 हजार रुपयांच्या नोटा सुद्धा मार्केटमधनं आरबीआय कडून या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्हाला दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेमध्ये जमा करून इतर मूल्याच्या नोटा तुम्हाला घेता येणार आहे. धन्यवाद