मित्रांना मोबाईल हा आपल्या आयुष्यातला एक अविभाजक घटक बनलेला आहे. त्या मोबाईल मधलं सिम कार्ड जे आहे त्याला Subscriber Identity Module असे म्हणतात.ती एक आपली एक प्रकारचे ओळख असते. जेव्हा आपण सिम घ्यायला जातो तेव्हा आपल्याला काही डॉक्युमेंट विचारले जातात जसे की आधार कार्ड किंवा मतदान कार्ड अशा प्रकारचे डॉक्युमेंट घेऊन तिथे आपल्याला सिम दिल जाते.



How Many SIM Cards Are Issued On Your Name

म्हणजेच आपल्या नावावर जे सिम आहे त्याचाच काही गैरवापर झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी आपली असते.

पण नाही कळत आपल्या नावावरती काही सिम कार्ड घेतलेली असतात. त्याची माहिती आपल्याला नसते. हे कसे चेक करायचे हे आपण पाहणार आहोत.

 

How Many SIM Cards Are Issued On Your Name

तुमच्या नावावर किती सिम आहे ते कसे तपासू शकता. 


1. tafcop.dgtelecom.gov.in पोर्टलवर या.

2. तिथे तुमचा मोबाईल नंबर टाका.

3. OTP सेंड या पर्यायावरती क्लिक करा.

4. तिथे तुमचा OTP टाकायचं आणि Validate वर क्लिक करा.

5. आता तुम्ही तुमचे नाव/मोबाइल नंबर/आधारला दिलेले सिम कार्ड पाहू शकता.


जर तिथे तुम्हाला तुमच्या नावावर जो नंबर दिसेल तुम्ही वापरत नसाल किंवा अगोदर वापरत होता तर त्या नंबर ची रिपोर्ट तुम्ही करू शकता. 'How Many SIM Cards Are Issued On Your Name'