नमस्कार, मित्रांनो राज्याचा कमाल तापमाना चा पारा हळूहळू वाढतोय. त्यातच वादळी पावसाचे सावट कायम असल्याने ढगाळ हवामान होत आहे.
![]() |
| Weather update |
Weather update
आज म्हणजे 4 मे रोजी राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तसेच 30 ते 40 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून मेघ गर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असताना ढगाळ वातावरण आणि उकाड्यात वाढ झाली आहे. 'Weather update'
परभणी शहर आणि परिसरात बुधवारी म्हणजे 3 मे रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली होती.
त्यातच राज्याच्या कमाल तापमानात ही चढ उतार सुरूच आहेत. बुधवारी म्हणजे सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये.
Weather update
जळगाव येथे राज्यातील उच्चांकी 36 अंश सेल्सिअस तापमाना ची नोंद झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 31 ते 36 अंशांच्या दरम्यान आहे. तापमाना तील चढ उतार सुरूच राहण्या ची शक्यता आहे. नैऋत्य मध्य प्रदेश पासून मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडू पर्यंत समुद्र सपाटी पासून 1.5 किलो मीटर उंचीवर हवे चा कमी दाबा चा पट्टा आणि खंडीत वारी ची स्थिती कायम आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू परिसरासह दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्या ची स्थिती तयार झाली आहे.

0 Comments
महाराष्ट्र योजनेबद्दलची ही वेबसाइट, मराठी बातम्यांची माहिती मराठीत जीआर यादी, आपल सरकार आणि मनोरंजन बद्दल अधिक जाणून घ्या