मित्रांनो महिला अनेक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्या ला खांदा लावून काम करत आहे. बर्याच महिलांना नोकरी च्या बंधनात अडकण्यापेक्षा स्वतः चा व्यवसाय करण्याची इच्छा असते. मात्र कधी चांगल्या बिझनेस आयडी च्या अभावी तर कधी पैशाच्या वेळी त्यांना आपल्या इच्छा पूर्ण करता येत नाहीत. अशाच महिलांना सरकार आर्थिक मदत करू इच्छितो आज आपण महिलांना मदत करण्यासाठी किंवा आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महिला उद्योग निधी योजना घेऊन आलो. या योजने ची पात्रता काय, किती रक्कम मिळणार, व्याज दर काय, कोणत्या व्यवसाया साठी कर्ज मिळणार, अर्ज कोठे व कसा करायचा ही सर्व माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत.

Mahila Udyam Nidhi Scheme
Mahila Udyam Nidhi Scheme

Mahila Udyam Nidhi Scheme

महिला उद्योजकांना प्रोत्साहन व सबलीकरण देण्यासाठी आणि कमी व्याजदराने आर्थिक सहाय्य देण्यासाठी महिला उद्योग निधी योजना लघुउद्योग विकास बँकेअंतर्गत सुरू करण्यात आले आहे. महिला उद्योगाला चालना देण्यासाठी ही योजना आखली गेली आहे. महिला उद्योग निधी योजना अंतर्गत महिलांना उद्योजकांसाठी दहा लाख रुपये पर्यंत लोन दिले जाते. यामध्ये महिलांनी स्वतःचा व्यवसाय किंवा छोटे छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी हे कर्ज दिले जाते. पंजाब नॅशनल बँक यांनी व्यवसाय कर्ज म्हणून महिलांना देण्यासाठी पुढाकार घेतल्या महिला उद्योग निधी योजनेअंतर्गत १० लाख रुपये पर्यंत कमी व्याजदरात हे महिला कर्ज घेऊ शकतात. ही फक्त योजना महिलांसाठी असून या योजनेची पात्रता काय ते पाहूया.


१. फक्त महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

२. जो कोणता व्यवसाय करणार आहेत, त्यामध्ये महिलांची 51 टक्के पेक्षा जास्त मालकी असणे आवश्यक आहे.

३. मंजूर कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षासाठी ०१% सेवा कर आकारला जातो.

४. या महिला कोणत्याही जाती किंवा कोणत्याही धर्मातील असल्या तरी चालतील. 'Mahila Udyam Nidhi'

Mahila Udyam Nidhi Scheme

या योजनेअंतर्गत कोणकोणते व्यवसाय सुरू करू शकतो ?

सेवा केंद्र


सौंदर्य प्रसाधनगृहे

कॅन्टीन आणि रेस्टॉरंट

रोपवाटिका

सायबर कॅफे

केअर सेंटर

लॉन्ड्री ड्रायक्लिनिंग

मोबाईल दुरुस्ती

झेरॉक्स सेंटर

टीव्ही दुरुस्ती

टू व्हीलर किंवा फोर व्हीलर खरेदी शोरूम

सलून

कृषी सेवा केंद्र

शिलाई दुकान

टायपिंग सेंटर

इलेक्ट्रॉनिक दुकान व इतर व्यवसाय


या योजने अंतर्गत लोन किती मिळणार ?

या महिला उद्योग निधी योजनेअंतर्गत महिलांना पाच ते दहा लाखापर्यंत लोन व्यवसायासाठी मिळणार आहे यासाठी व्याजदर देखील कमी असणार आहे तसेच दहा लाख रुपये असल्यास किंवा कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षाखाली एक टक्के सेवा कर आकारला जातो तसेच व्याजदर शेवटी बदलू शकतो.

Mahila Udyam Nidhi Scheme

या योजनेअंतर्गत कर्जाची परतफेड कधी करावी ?

तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी लोन मिळाल्यापासून कमीत कमी पाच वर्षाच्या मुदत कालावधीत व जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड करू शकता ''Mahila Udyam Nidhi''


या योजनेसाठीचा अर्ज कुठे व कसा करायचा?

तुमच्या जवळपास कोणतीही पंजाब नॅशनल बँक तिची शाखा असेल त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन या योजनेचा अर्ज करायचा आहे.

Mahila Udyam Nidhi Scheme

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

१. आधार कार्ड

२. पॅन कार्ड

३. मागील नऊ महिन्यांचे बँक स्टेटमेंट

४. दाखल केलेली आयटीआर प्रत

५. कोणत्याही एका घराच्या किंवा व्यवसायाच्या जागेच्या मालकीचा पुरावा.