Maharashtra - state transport scheme
Maharashtra - state transport scheme

Maharashtra - state transport scheme

मित्रांनो सुट्टी मध्ये एसटीने फिरण्याचा प्लॅन करत असाल तर प्रत्येक ठिकाणासाठी लागणारे प्रवास भाड्यावर अधिकचा खर्च न करता तुम्ही एसटीच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेचा लाभ घेऊ शकता यामध्ये तुम्हाला पास काढता येतो आणि पासच्या प्रकारानुसार त्या ठराविक कालावधीमध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बस नाही प्रवास करता येतो अगदी आंतरराज्य प्रवास सुद्धा तर कोणत्या पास साठी किती पैसे भरावे लागतील एसटीच्या कोणकोणत्या बसेस मध्ये तुम्हाला प्रवास करता येईल पास ची मुदत किती असेल हे सर्व आपण या लेखा मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना सन 1988 पासून प्रवाशांसाठी राबवित आहे सर्वप्रथम पास संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना आपण बघू व शेवटी पाच साठी किती पैसे भरावे लागतील याची माहिती


मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रवाशांना सात दिवसांचा आणि चार दिवसांचा पास दिला जातो पास काढायचा असल्यास एसटी आगारामध्ये तुम्हाला त्या खिडकीवर जाऊन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून मिळवता येतो पास साठी आधार कार्ड पॅन कार्ड यासारखे आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे असेल.

Maharashtra - state transport scheme

 साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेस साठी तसेच साधी बस जलद बस रात्र आणि शहरी यशवंती तसेच आंतरराज्य मार्गांसाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात निम आराम बस सेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आलेले नाहीत जर तुम्ही शिवशाही बसचा पास घेतला तर तो शिवशाही बस सेवेसह साधी बस निम आराम या सर्व सेवेसाठी तसेच एसटीने आंतरराज्य म्हणजे महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रवास करण्यासाठी देखील गह्य राहील.

 पास तुम्हाला दहा दिवस अगोदर पर्यंत घेता येतो आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेचे पास नियमित बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणारे यात्रा बसेस मध्ये सुद्धा ग्राह्य राहील.


 पास काढला म्हणजे तुम्हाला त्यावर प्रवास करता येतो पण बस मध्ये सीट मिळेल याची गॅरंटी नसते त्यामुळे तोच पास दाखवून तुम्हाला प्रवास सुरू करण्यापूर्वी आरक्षण खिडकीवर जाऊन जागा आरक्षित करता येते म्हणजे रिझर्वेशन चार्जेस भरून करता सीट रिझर्व करता येते.

पास काढल्यानंतर व्यक्तीला त्यांच्यासोबत तीस किलो वजनाचे प्रवासी सामान आणि बारा वर्षाखालील मुलाला 15 किलो वजनाचे प्रवासी समान विनाकार म्हणजे पैसे न भरता घेऊन जात येते.

आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसणे प्रवास करता येईल लक्षात असू द्या जर पास तुमच्याकडून हरवला तर डुप्लिकेट पास मिळत नाही किंवा त्यासाठी भरलेले पैसेही मिळणार नाही त्यामुळे पास काढल्यानंतर तो व्यवस्थित संभाळण्याची जबाबदारी तुमचीच असणार आहे.

Maharashtra - state transport scheme

तुमच्या पास काढलाय एका ने पण त्यावर प्रवास दुसराच कोणी करत असेल तर असा पास जप्त होऊ शकतो. कारण हा पास अस्तरणीय आहे.

 प्रवासात वैयक्तिक वस्तू गाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी घेत नाही.

नातलगाचा मृत्यू,भूकंप, आग लागणे, अतिवृष्टी, महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पास रद्द करायचा असेल तर प्रवासाच्या तारखेपूर्वी याची कल्पना देऊन तुम्हाला पास साठी भरलेले पैसे परत मिळवता येतात परंतु अशावेळी काढलेल्या प्रत्येक पास मागे वीस रुपये सेवा शुल्क कापून घेतले जाते.


आता या पास साठी किती पैसे भरावे लागतील मित्रांनो पास सात दिवसांसाठी आणि चार दिवसांसाठी मिळतो साधी बस आणि शिवशाही या दोन कॅटेगरीमध्ये तसेच पोड व्यक्ती आणि मुले दोघांसाठी पाचशे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. 


 यामध्ये मुलांचे वय पाच वर्षाहून अधिक आणि बारा वर्षांपेक्षा कमी असायला हवे साधी बस म्हणजे लाल परी जलद रात्रसेवा शहरी व यशवंती आंतरराज्य या पास करिता प्रौढ व्यक्तीला जर सात दिवसांचा पास पाहिजे असेल तर 2040 रुपये भरावे लागतील.

 मुलासाठी सात दिवसाच्या पासला 1025 रुपये भरावे लागतील.

 त्याचप्रमाणे प्रौढ व्यक्तीला जर चार दिवसांचा पास काढायचा असेल तर 1170 रुपये आणि मुलांच्या पास साठी 585 रुपये भरून पास मिळवता येतो.

 जर शिवशाही आसनी म्हणजे सीट असेला पास घेणार असाल तर हा पास इतर सर्व बस सेवांसाठी सुद्धा चालू शकतो त्या बसमध्ये प्रौढ व्यक्तीला सात दिवसांच्या पाच साठी 3030 रू तर मुलांच्या पास साठी 1520 रू भरावे लागते.

 तर चार दिवसांच्या पास साठी प्रौढ व्यक्तीला 1520 रुपये आणि मुलांच्या पास साठी 765 रुपये एकूण मूल्य भरावे लागेल.

 उदाहरणार्थ कुटुंबामध्ये जर चार व्यक्ती आहेत पती-पत्नी आणि दोन मुले यांचे वय पाच ते बारा वर्षा दरम्यान आहे तर अशावेळी चौघांसाठी पास काढावा लागेल या कुटुंबाला सात दिवसांच्या पास साठी एकूण 6320 रुपये आणि चार दिवसांच्या पास साठी 3510 रुपये भरावे लागते जर यांनीजर शिवशाही बसचा पास काढायचे ठरवले तर सात दिवसांसाठी एकूण 9100 रुपये, आणि चार दिवसांच्या पास साठी चौघांनाही एकूण 4570 रुपये भरून पास मिळवता येतो सात दिवसासाठी किंवा चार दिवसांसाठी काढलेले या पास वर राज्यामध्ये किंवा राज्यातून एसटी ज्या ज्या ठिकाणी जाता येतात.योजनेचा अवश्य लाभ घ्या. धन्यवाद

Maharashtra - state transport scheme